अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास 14 वर्ष कारावास

0

जळगाव। शहरातील रामेश्वर कॉलनीत भाड्याच्या घरात राहणार्‍या 34 वर्षीय नराधमाने पीडित मुलीचे कुटूंबीय घरी नसल्याची संधी साधुन तिला तिच्या घरात घेवून जात तिचे तोंड दाबून अत्याचार केला होता. या प्रकरणी नराधमाविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला जळगाव न्यायालयात सुरू होता. याचा महत्वपूर्ण निकाल 4 रोजी होवून न्या. के. बी. अग्रवाल यांनी त्याला 14 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात माझोड गावी राहणारा जितेंद्र कैलास खंडारे हा व्यवसायासाठी जळगाव शहरात रामेश्वर कॉलनीतील एका घरात भाड्याने राहत होता. त्यावेळी पीडीत बालिकेच्या कुटूंबियांच्या दुसर्‍या मजल्यांवर जितेंद्र राहत होता.

दहा साक्षीदार तपासणी
पिडीत मुलीने कुटूंबीय घरी परत आल्यानंतर घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी लागलीच औद्योगिक वसाहत पोलिस ठाणे गाठून जितेंद्र वैैलास खंडारे (वय 34) याचेविरुध्द भादंवि कलम 376 (2) फ, 506, 306 बालकाचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा कलम 4 अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. दहा साक्षीदारांची तपासणी पीडित मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी न्यायालयात सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.

376 फ नुसार कारवाई
बचाव पक्षातर्फे दोन साक्षीदार तपासले. पीडीत मुलीची साक्ष न्यायालयाने महत्वाची ठरली. न्या. के.बी. अग्रवाल यांनी आरोपी जितेंद्र खंडारे याला कलम 376 (2) फ मध्ये 14 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच 5 हजार रुपये दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद यासह कलम 506 मध्ये 1 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. याबाबत सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. चारुलता बोरसे यांनी काम पाहिले.

जीवे मारण्याची दिली धमकी
पीडीत बालिकेचे कुटूंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना जितेंद्र याने 7 नोव्हेंबर 2014 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पिडीत मुलीला ‘तुला वरच्या खोलीत बोलवत आहे.’ असा खोटा बहाणा करीत तिला स्वत: घेवून गेला होता. त्यावेळी तिला घरात नेवून घराचा दरवाजा आतून बंद करीत पिडीत मुलीचे तोंड दाबून अमानुषपणे तिच्यावर बलात्कार केला व कुणासही काही एक सांगितल्यावर जीवे ठार मारण्याची धमकी दिली.