रावेर तहसिलदारांना दिले निवेदन
जळगाव । धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचारासंदर्भात सर्व आरोपींवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रावेर तेली समाजातर्फे रावेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अल्पवयीन मुलीवरील अतिप्रसंगाची घटना अतिशय निंदनीय असून या घटनेचा निषेध रावेर तेली समाजबांधवांकडून करण्यात आला. या घटनेतील सर्व आरोपी व नराधमास तात्काळ अटक करावी, तपास विशेष पथकाकडे देण्यात द्यावा, खटला अतिशिघ्र न्यायालयात पाठवण्यात यावा, विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यात यावे, पीडित मुलीला शासकीय धोरणानुसार मदत करण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
यांची होती उपस्थिती
रावेर तहसिलदार विजयकुमार ढगे यांना देतेवेळी नारायण चौधरी, भगवान खंडू चौधरी, पांडुरंग चौधरी, देविदास चौधरी, विलास चौधरी, अॅड.भगवान चौधरी, अॅड.रविंद्र चौधरी, सूरज चौधरी, अशोक चौधरी, भागवत चौधरी, गोपाल चौधरी, संजय चौधरी, अनिल चौधरी, राजेंद्र चौधरी, सुभाष चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, सुनिल चौधरी, कडू श्रीपत चौधरी, पंकज चौधरी, भुषण महाजन, भुषण चौधरी आदी आदींसह रावेर तालुक्यातील तेली समाज बांधव उपस्थित होते.