जळगाव । शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधम युवकास अटक करण्यात आली आहे.
एमआयडीसीतील एका कंपनीच्या आवारातील खोलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात युवकाविरुद्ध पोस्को, अॅट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मयूर रवींद्र पाटील (वय २०, रा. आसोदा) असे आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली. अधिक तपास पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे करीत आहेत.