पुणे । सोळा वर्षीय मुलीवर शेजारीच राहणार्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने घरात घुसून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता वारजे पोलिसांच्या हद्दीत घडला. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सुनील लक्ष्मण क्षीरसागर (वय-43, रा. संयोगनगर) असे अटक झालेल्याचे नाव आहे.
अल्पवयीन मुलगा हा पीडित मुलीच्या घराजवळच राहतो. घटनेच्या दिवशी त्याने जबरदस्तीने घरात प्रवेश करत तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी विरोध करत असताना मारहाण करत तिला जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी क्षीरसागर याने घराबाहेर थांबून इतरांवर लक्ष ठेवत आरोपीला मदत केली. पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. सोळंके अधिक तपास करीत आहेत.