जळगाव । शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी अल्पवयीन सतरावर्षीय बालीकेला अज्ञात तरुणाने फुसलावून पळवून नेल्याची घटना सोमवारी रोजी घडली होती. रामानंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल होवुन पिडीतेच्या कुटूंबीयांनी पोलिसांच्या मदतीने शोध लावत दोघांना नाशिक येथून ताब्यात घेत जळगावी आणले. संशयीत तरुणाला अटक करण्यात आली असुन तरुणी माता-पित्याकडे परतली आहे.
युवतीला फुस लावून पळवून नेले
जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील मध्यवर्गीय कुटूंबातील अवघ्या सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीला परिसरातीलच एका तरुणाने फुस लावून पळवून नेले होते. पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात 26 जुन रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. तरुण मुलगी बेपत्ता झाल्याने कुटूंबाने ईदचा सण सोडून शोध कार्य राबवले. गल्लीपासून ते मित्र मैत्रीणी आणि नातेवाईकांकडे शोध सुरु होता. परिसरातीलच तरुण अहमद अली शौकत अली याने तरुणीला पळवल्याचे निष्पन्न झाले. रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रोहम यांनी मुलीच्या शोधार्थ संपुर्ण सहकार्य पुरवत मार्गदर्शन केल्याने पोलिसांसोबतच कुटूंबीयसुद्धा तिच्या मागावर होते. मंगळवारी संध्याकाळी दोघेही नाशिकला असल्याची माहिती मिळताच त्या दोघांना ताब्यात घेत जळगावी आणण्यात आले.
न्यायालयीन कोठडीत रवागनी
अल्पवयीन पिडीता व तिच्या कुटूंबीयांचे समुपदेशन यशस्वी होवून पिडीतेने आई-वडीलांसोबत घरी जाण्याचा निर्णय घेतला. अटक करण्यात आलूेला संशयीत अहमद अली शौकत अली यास आज न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने संशयीताला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.