शहादा। अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याच्या प्रकरणीचा दोष सिद्ध झाल्याने येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस दोन वर्षे सक्त मजूरी व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. पीडीत मुलीचे आई वडील इद निमित्त बडवाणी (म.प्र.) येथे होते. त्यावेळी पीडीत मुलीस शहादा येथील गरीब नवाज कॉलनीत राहणार तिचा भाऊ सादीक कडे सोडून गेले होते.
पीडीत मुलीचे आई वडील बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत बुधवार 16 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अली अब्बास अली रा. मेहदिया वही (जि. प्रतापगड उत्तरप्रदेश ह.मु.शहादा)हा पीडीत मुलीचे भावचे घरी मोटार सायकल घेवून आला व म्हणाली की तुझे आईवडील परत घरी आले आहे. सदर मुलीस त्यांनी बोलावले आहे. सादीक याने तिच्या बहिणीला त्याच्यासोबत पाठवून दिले. नंतर सादिक हा त्याचे आईवडीलांकडे त्याच्याकडील सालदार नगरात गेला असता घरी कोणीही नसल्याचे लक्षात आल्याने पीडीताचे आईने आरोपी रमजान अली अब्बास अली याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालीन तपासणी व पुराव्यानुसार पीडीत मुलीला फुस लावून पडविल्याच्या कारणावरून गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल दिला.