अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले

वरणगाव : वरणगाव फॅक्टरी वसाहतीला लागून असलेल्या अन्नपूर्णा नगर, दर्यापूर भागातील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवार, 4 रोजी कुटुंब झोपेत असताना कुटुंबातील साडे सतरा वर्षीय मुलगी घरात न दिसल्याने सर्वत्र शोधाशोध करण्यात आली मात्र मुलगी न आढळल्याने कुणीतरी तिला पळवून नेल्याच्या संशयावरून वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रंगाने गोरी, शरीरबांधा सडपातळ, उंची पाच फूट, चेहरा लांबट, नाक सरळ, डोळे मोठे, केस लांब काळे, अंगात पिवळ्या रंगाचा टी शर्ट व नाईट पॅन्ट असे वर्णन आहे. तपास सहा.पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार नरसिंग चव्हाण, नागेंद्र तायडे, अतुल बोदडे करीत आहेत.