अल्पवयीन मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार

0
रुपीनगरमधील आरोपीला अटक
पिंपरी-चिंचवड : अल्पवयीन मूकबधिर मुलीला आपल्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना रुपीनगर, तळवडे येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संजय सत्यवान उतेकर (वय 27, रा. रुपीनगर, तळवडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 26) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उतेकर आणि अल्पवयीन मूकबधिर मुलगी यांची ओळख होती. आरोपी उतेकर 11 डिसेंबर रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजताच्या सुमारास अल्पवयीन मुलगी एकटी असताना घरी आला. त्यावेळी आरोपीने तिच्याशी गोड बोलून तिला आपल्या घरी नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही बाब मुलीने आपल्या पालकांना सांगितली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.