मुक्ताईनगर। बोदवड येथील 17 वर्षीय अल्पवयीन युवतींचा विनयभंग केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील बोदवड येथील अल्पवयीन युवतींचा शंकर दशरथ तलवारे याने विनयभंग केला. पिडीतिच्या फिर्यादेवरुन आरोपीविरूध्द विनयभंग व बालकाचे लैंगिक गुंह्यापासुन संरक्षण कायदा 2012 कलम 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कडूकार करित आहे.