अल्पवयीन युवतीवर अत्याचार

0

नंदुरबार। जिल्ह्यातील रामपूर येथे एका युवतीवर अत्याचार झाल्याची फिर्याद तळोदा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी युवकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामपूर येथील आकाश छगन नाईक या तरूणाने गावातीलच एका अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमीष दाखवले. या कालावधीत आकाश याने वारंवार पिडीत युवतीवर अत्याचार केला. अशी फिर्याद युवतीच्या वडीलांनी पोलिसात नोंदविली आहे. त्यानुसार आकाश नाईक या तरूणाविरुद्ध 376 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.