अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

0

पाटणा- आणखीन एक बलात्काराची घटना उघकीस आली आहे. बिहारमध्ये बलात्काराच्या घटना कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. शाळेतून माघारी येत असताना एका अल्पवयीन मुलीवर तिच्या गल्लीमध्ये राहणाऱ्या दोन मुलांनी बलात्कार केला.

पीडित विद्यार्थिनी शाळेतून घराकडे परतत होती. त्यावेळी दोन मुलांनी तिला रस्त्यातच थांबवून घेतले आणि काही कारण सांगत तिला एका खोलीमध्ये घेऊन गेले. त्यानंतर त्या दोन्ही मुलांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती मुलीच्या वडिलांना समजताच त्यांनी जक्कनपूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. यापैकी एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. हा गुन्हा पोक्सो कायद्यातील तरतुदींनुसार दाखल करण्यात येणार असल्याचे एसपी राजेंद्र कुमार भील यांनी सांगितले.