भुसावळ- शहरातील सेंट्रल रेल्वे प्रायमरी स्कूलच्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना चाकूच्या धाकावर ठार मारण्याची धमकी देत पळवून नेल्याप्रकरणी संशयीत आरोपी मनीष रवींद्र ठाकूर (गंगाराम प्लॉट, भुसावळ) व अर्जुन विजय सपकाळे (सात नंबर चौकीजवळ, भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी मनीष ठाकूरला अटक केल्यानंतर गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, शहर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चाकू हस्तगत केला आहे. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय संजय कंखरे करीत आहेत.