अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदाची संधी मिळावी

0

भुसावळ : अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी जैन समाजाच्या व्यक्तीस किमान एकदा संधी देण्यात यावी अशी मागणी येथील जैन समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना मंगळवार 27 रोजी निवेदन देण्यात आले आहे.

अल्पसंख्यांकांच्या विकासाला गती मिळणार
केंद्र व राज्य पातळीवर अल्पसंख्याक आयोग आहे. अनेक वर्षांपासून अल्पसंख्याकांमध्ये मुस्लीम समाजासोबत जैन, ख्रिस्ती, शिख, पारशी आदी समाजांचा समावेश करण्यात आला आहे. यातील जैन समाज वगळता अन्य समाजाला राज्य व केंद्र पातळीवर मोठ्या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक आयोग अध्यक्षपदी आजपर्यंत केवळ मुस्लीम समाजालाच संधी देण्यात आली आहे. किमान एकदा जैन समाजाला अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद भुषविण्याची संधी देण्यात यावी, तसे झाल्यास देशाच्या व अल्पसंख्याक समाजांच्या विकासाला गती मिळेलच त्यामुळे समाजाच्या भावना शासनाकडे पोहचविण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी रितेश जैन, कांतीलाल चोरडीया, जैन सोशाल गृपचे अध्यक्ष प्रशांत कोटेचा, जैन सोशल गृप चेअरमन गौतम चोरडीया, विशाल चोरडीया, ललीत घोटी, महेंद्र चोरडीया, भगवान जैन, प्रविण जैन, राजेश बाफना, जितेंद्र जैन, सुभाष चिप्पड, निखील गाडीया, डॉ. अभय कोटेचा, नविन चोरडीया, जे.पी. चोरडीया, राहूल कोटेचा, नगरसेवक निर्मल कोठारी उपस्थित होते.