अल्पसंख्याक महिलेवर झालेल्या अन्यायाविरूद्ध धरणे

0

धुळे। शिरपूर रिक्रीएशन गार्डन मध्ये विक्रेते व महिला यांच्यात किरकोळ वाद झाला होता. वादाचे रूपांतर हाणामारीत होवून नंदूरबार येथील अल्पसंख्याक महिलेस परिवारासह मारहाण केल्याची घटना दि.2 मे रोजी घडली होती. दरम्यान याप्रकरणी शिरपूर पोलीसात एकमेकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. पंरतू शिरपूर पोलीसांनी महिलेला मारहाण केलेल्या संशयित आरोपींना अद्याप अटक केली नाही त्यामुळे अल्पसंख्याक विकास व हक्क फाऊंडेशनच्या वतीने दि.16 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष फारूक शेख,महासचिव डॉ.मतीन शेख,उपाध्यक्ष अब्दुलखान पठाण,कमरअली सैय्यद अली,सगीर मन्सूरी,जावीद शेख, सलमान काझी,जाकीर तेली,सोहेल खाटीक,सादप शेख, नगरसेवक कमरोद्दीन शेख,नगरसेवक इरफान मिर्झा आदी सहभागी झाले होते.

अशा आहेत मागण्या : ज्या नराधमांनी महिलांना मारहाण केली व विनयभंग केला त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. ज्या ठेकेदारांनी असे कृत्य वेळोवेळी करणार्‍यांना साथ दिली त्याचा ठेका रद्द करण्यात यावा. ज्या अधिकार्‍यांनी उशीरा तक्रार विरूद्ध तक्रार नोंदवण्यासाठी मदत केली त्या अधिकार्‍यांना त्वरीत निलंबीत करून गुन्हा दाखल करावा