निजामपुर। साक्री तालुकयातील पिंपळनेर येथे धुळे जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने ईद मिलन समारोह कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी व जिल्हा संपर्कप्रमुख फैयाजशेख ठाणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हाअध्यक्ष बबन चौधरी होते. कार्यक्रम सुरूवातीला अमरनाथ याञेवरील दहशवादी हल्लात मूतयु पावलेलया निष्पाप भाविकाना श्रंदाजली देण्यात आली. यावेळी मंत्री जयकुमार रावळ यांनी फोन वरून कार्यकता मार्गदर्शन केले व ईदच्या शुभेच्छा दिल्या. प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी यांनी मार्गदर्शन करतांना केंद्र व राज्य सरकार विविध कल्याणकारी योजना राबवित आहे या योजनाचा लाभ सर्व सामान्य जनतेपयत पोहचविणयासाठी भाजपा कार्यकत्यानी प्रयत्नशील रहावे, असे सांगितले.
सबका साथ सबका विकास
मुस्लीम बांधवांना जास्तीत जास्त लोकांनी भाजपात सामिल व्हावे. भाजपा सरकार सबका साथ सबका विकास कार्यकम राबवित आहे.भाजपापक्ष हा देशात सर्व मोठा पक्ष आहे. सर्वात जास्त खासदार आमदार आहेत. यापक्षाने देशात मुस्लीम राष्ट्रपती केले. अनेक अल्पसंख्याक कार्यकर्ता आमदार खासदार केले. विविध महामंडळावर नियुक्ति केल्यातरी पक्षात जास्तीत जास्त लोकांनी सामिल व्हावे असे आवाहन केले. यावेळी वसंतराव बच्छाव. बाबा पठाण फैयाज शेख, संभाजीपगारे आदींनी संबोधित केले. यावेळी संजय अहिरराव, राजेन्द्र खैरनार , मुबिन शेख, ताहीरबेगमिरजा, आरीफसर, महेन्द्र देसले,आरीफ हफिज, युनुस शेख,फैयाजशेख व मोठ्या संख्येने अल्पसंख्याक मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थितीत होते. यावेळी सुत्रसंचालन शेख आरीफ यांनी केले. प्रस्तावना व आभार जिल्हाध्यक्ष सैयद फिरोज यांनी केले.