अल्पसंख्याक योजनांचा लाभ घेवून समाजाने विकास साधावा

0

अमळनेर। अल्पसंख्याक मुस्लिम समाजात केवळ मूठभर लोकांचा विकास झाला असून शतप्रतिशत समाजाचा विकास होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध अल्पसंख्याक योजनांचा लाभ घेऊन शैक्षणिक व आर्थिक विकास या समाजाने साधावा, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी अमळनेर बाजार समितीत झालेल्या अल्पसंख्याक मेळाव्यात केले. मेळाव्यात भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा सरचिटणीस आरिफ शेख, अनुसूचित जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन कोळी, जाकीर खा मेवाती, सारबेटे आदींसह पदाधिकारी व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी अल्पसंख्याक आघाडीचे अमळनेर तालुकाध्यक्ष म्हणून कदामत खा अ, रहेमान खा मेवाती, सारबेटे यांची तर सरचिटणीस म्हणून जलिमोद्दीन सलीमोद्दीन मुजावर यांचेसह कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली.

अल्पसंख्याक आघाडी तालुका कार्यकारिणी
अध्यक्ष-कदामत खा अ.रहेमान खा मेवाती, सरचिटणीस-जमिलोद्दीन सलीमोद्दीन मुजावर, उपाध्यक्ष-अमजद खा उमर खा मेवाती, अन्वर शहा नितीन शहा, डॉ.जाकिर शेख, नुरून शेख रउफ शेख, चिटणीस-जावेद शेख कादर शेख, शाबन शहा मोहंमद शहा, कासम मिस्तरी, गुलाम रसूल खा मेवाती, कोषाध्यक्ष-वसीम खान मणियार, प्रदीद्ध प्रमुख-राहिमोद्दीन शेख, कार्यालय मंत्री-हुसेन पिंजारी, सदस्य- अजीज बागवान, आसिफ खान मेवाती, गुलाम नबी मेवाती, अमीन खा मेवाती सारबेटे, कासम मिस्तरी, अन्वर मिस्तरी, कातीक शाह, उस्मान शाह, राउफ शेख, जकिर पिंजारी, एलोद्दीन पिंजारी, आसिफ शेख, मुक्तार शहा, महंमद शहा, शब्बीर शहा, नासिर शेख, जावेद खा मेवाती, सादिक खा मेवाती, इरफान खा मेवाती, यासीम खा मेवाती, सिकंदर मेवाती, मसीद मेवाती, अमजद खा, वाईद खा, आदिल खा, सारबेटा, जविद पिंजारी, हुसेन पिंजारी, गांधली यांची निवड करण्यात आली.