अल्पसंख्याक समाजातर्फे आमदारांना मागण्यांचे निवेदन

0

चाळीसगाव । येथील ऑल इंडीया तहेरीके खुदादाद व ऑल मुस्लीम समाज बिरादरी बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या विवीध मागण्यांचे निवेदन आमदार उन्मेश पाटील यांना देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव येथे कब्रस्तानची जागा मुस्लीम समाजाला कमी पडते यामुळे आमदार यांनी मुस्लीम समाजाला नगरपालीकेतर्फे 2 किंवा 3 एकर जागा देण्यात यावी, त्रिमुर्ती एज्युकेशन वेल्फेअर सोसायटीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, त्यांना न.पा.ने दिलेल्या ओपन प्लेसला कंपाउंड व सभागृहासाठी व व्यायाम साहीत्यासाठी उपलब्ध करुन द्यावा.

दर्ग्यांचा विकास करा
तीन जागांवर हायमास्ट लाईट द्यावे. प्राथमिक उर्दु न 1 व 2 शाळेसाठी स्लॅब, शौचालय व पाणी व्यवस्थापनासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. संजय गांधी निराधार योजना समितीमध्ये अल्पसंख्याक समाजाचा एक सदस्य घ्यावा, पिर मुसाकादरी बाबा दर्गा विकासासाठी वेळोवेळी मागणी केली आहे. निवेदने दिली पाठपुरावा करुन उपोषणे केली मात्र त्याचा काही फायदा झाला नाही तो प्रश्‍न सोडवावा या मागण्या अध्यक्ष अल्लाउद्दीन शेख यांनी केल्या आहेत. निवेदन देते वेळी नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, शेख रियाज, शेख अयास, लुकमान शाह, लतीफ बिल्डर, फेरोज खान, बबलु मन्यार, साजीद खान, सैय्यद मुनव्वर, अजगर अली, अमजद पठाण, मुजाईद बेग, आलम पटवे, शकील शेख, मोन्टी शेख, वायेद शेख, डॉ नासीर कुरेशी व मुस्लीम बांधव उपस्थित होते.