1800 kg ghee sold at low price in District Milk Union: Crime against one जळगाव : जळगाव जिल्हा दुध संघात प्रशासकराज संपुष्टात आल्यानंतर संचालक मंडळ कार्यान्वीत झाल्यानंतर आता नवीन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अल्प किंमतीत तब्बल एक हजार 800 किलो तूप विकून एक लाख 53 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
एकाविरोधात गुन्हा दाखल
शैलेश सुरेश मोरखडे (45, दुध विकास फेडरेशन ,जळगाव) यांनी निखील सुरेश नेहते (रा. दादावाडी खोटे नगर, जळगाव) सोबत इतर कर्मचारी (नाव व पत्ता माहित नाही) विरुद्ध फिर्याद दिली आहे. 1 ते 23 ऑगस्ट 2022 च्या दरम्यान निखील सुरेश नेहते व त्याच्या सोबत असलेले कर्मचारी यांनी जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादीत जळगाव यांच्या मालकीचे 1800 किलो तूप हे 85 रुपये दराने प्रशासक समितीची पूर्व परवानगी न घेता विठ्ठल रुख्मिणी एजन्सीला एक लाख 53 हजार रुपयात अर्थात कमी किंमतीत विक्री करुन जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादीतचे प्रशासक समितीची फसवणूक केली. यामुळे जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अंदाजे दोन लाख सात हजारांपेक्षा अधिक रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. याप्रकरणी निखील सुरेश नेहतेसह इतर कर्मचारींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत.