अल्प पेंन्शन धारकांचा मेळावा

0

तळेगाव दाभाडे : निवृत्त कर्मचारी संघटना व राष्ट्रीय लोककल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथे अल्प पेन्शन धारकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तळेगावातील श्री दत्त मंदिर येथे सदर मेळावा पार पडला.यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सुधाकर देशामुख, शंकरराव शेवकर, नितीन भांबल, दिलीप चौधरी, शेखर गुंड, अप्पाराव ऐन्नापार्थी, अरुण बढे, राजाभाऊ नाटक, दशरथ ढोरे, रमेश शिंदे आदि कामगार बहुसंखेने उपस्थित होते.यावेळी सन 1995 अल्पपेन्शन धारक यांनी अनेक मागण्या बाबत चर्चा करून संबधीत शासकीय कार्यालयाचे प्रमुख व लोक प्रतिनिधी यांना मागण्याचे निवेदन देण्याचे मान्य केले.

या आहेत मागण्या
निवृत्त कर्मचार्‍यांना कोर्टाच्या निर्णयानुसार सुधारित पेन्शन मिळावी,पेन्शन धारकांच्या मृत्यू नंतर त्याच्या वारसाला पेन्शन मिळावी , निवृत्ती नंतर कुटुंबाला वैद्यकिय सेवा मिळावी , सुधारित पेन्शन मिळेपर्यंत 7 हजार 500 रुपये पेन्शन महागाई भत्यासहित मिळावी, निवृत्ती नंतर फंडातील रक्कम त्याच्या कुटुंबास मिळावी, निवृत्ती नंतर वयाचा विचार करता ज्या ठिकाणी काम केले त्याठिकाणी व भविष्यनिर्वाह निधी कार्यालयामध्ये पेन्शनरला सन्मानाची वागणूक मिळावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.