जळगाव । 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना आणि शहीद टिपु सुल्तान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतावर आधारित उर्दू-मराठी भाषिक कवी संमेलन संपन्न झाले. जळगाव शहरात पत्रकार भवन येथे अब्दुल करीम सालार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सर्व मान्यवर आणि कवी, कवयित्री यांच्याहस्ते दीपप्रवलन करुन कवी संमेलनाला प्रारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अकरीम सालार, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, जमील देशपांडे, बशीरभाई बुरहानी, इंजिनियर मंजूरखान, शेर खान पत्रकार, बाळूभाई शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हरुन उस्मानी आणि कय्युम असर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन युसूफ शाह अध्यक्ष असलेल्या ‘अल-खैर ट्रस्ट‘ या सामाजिक संघटनेने केले होते.
देशप्रेमावर आधारीत कवितेचे सादरीकरण
या कार्यक्रमात उर्दू, मराठी, हिंदी कवींनी आपल्या देशप्रेमावर आधारित कविता सादर केल्या. यामध्ये डॉ.प्रियंका सोनी ‘प्रित‘, डॉ.शापिक नाजीम, मुश्ताक साहिल, वकार सिद्दीकी, विनोद अहिरे, शफिक असरद, मुश्ताक-मुश्ताक(मालेगाव), प्रशांत सोनवणे, सईद जिलानी, साबीर नशिराबादी, अखलाक निजामी आदींनी भाग घेतला व देशभक्तीपर शेरो-शायरी, गीत-कविता आणि गझले सादर केली. यात ‘सरहद पे देश की जो अपना खून बोते है, वो राष्ट्रभक्त देश के सपूत होते है‘(डॉ.प्रियंका सोनी- प्रित) आणि डॉ.शफिक नाजीम यांची ‘हम सबकी जननी है भारत, हम है जा, इस से प्यार हमे है ऐसा जैसे अपनी माँ, आओ मिलकर माँ के मुखपर थोडी मुस्कान सजाए‘ या कविता दाद मिळवून गेल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल-खैर ट्रस्टचे संचालक युसूफ शाह, जुबेर खान, तन्वीर शेख, सैय्यद अझहर, सद्दाम शाह, रिहान असरार बागवान, मुदस्सीर काकर, सलिम आदींनी परिश्रम घेतले.आभार युसूफ शाह यांनी मानले.