मुक्ताईनगर : दोन दिवसांपूर्वी आलेल्या चक्रीवादळाने शेकडो हेक्टरवरील केळी जमीनदोस्त होवून घरांची पडझड होवून शेतकर्यांसह ग्रामस्थ सावरत नाही तोच पुन्हा शुक्रवार, 29 मे रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हाकाकोडा परीसरातील रीगाव, पिंप्राळा शिवारात झालेल्या अवकाळी पावसासह वादळामुळे घरांची पडझड झाली तसेच शेती शिवारात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
चार भाविक झाले जखमी
जुने पिंप्राळा शिवारात असलेल्या चैतन्य हनुमान मंदिर येथे मंदिराजवळ असणार्या पिंपळ आणि कडुलिंबाची फांदी तुटून पडल्यामुळे महंत दरबार पुरी महाराजांसह चार भाविक गंभीर जखमी झाले. येथे असणार्या गोशाळेतील दोन गायी मृत्युमुखी पडल्या व काही गंभीर जखमी झाल्या. रीगाव येथे सुद्धा वादळामुळे घरावरील पत्रे उडाली तर काही घरांवर झाडाच्या फांद्या कोसळल्याने घरांसह जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले तसेच शेती शिवारात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जिल्हा बँक अध्यक्षांनी केली पाहणी
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी पिंप्राळा आणि रीगाव येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली तसेच तहसीलदारांसोबत चर्चा करून नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याबाबत चर्चा केली तसेच विद्युत वितरणचे अभियंता राठोड यांच्या सोबत चर्चा करून वादळामुळे तुटून पडलेल्या विद्युत तारांची जोडणी करून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली. यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर, डॉ.बी.सी.महाजन, उपसरपंच पुंडलिक कपले, विशाल महाराज खोले, सरचिटणीस रवींद्र दांडगे, ओमप्रकाश चौधरी, रणजी गोयंका, डॉ.गजानन खिरळकर, रमेश खंडेलवाल, रीगाव सरपंच निर्मला पारधी, उपसरपंच शोभा गणेश विटे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश खंडरे, पोलीस पाटील युवराज बगळे, गोपाळ रामभाऊ पाटील, शिवाभाऊ पाटील, अनंता पाटील, गणेश विटे, प्रभूसिंग बळूगे, तलाठी संतोष गायकवाड, कोतवाल एकनाथ हळदे, सचिन पाटील, माणिकराव पाटील, योगेश विटे, तेजराव भोलाणकार, सुकलाल विटे, अमोल बगळे, शंकर विटे, पिंटू कांडेलकर, संतोष शंकर विटे, तोताराम खंडारे, सारंगधर कोळी, रवी पाटील, संतोष कांडेलकर, राजेश ढोले, प्रवीण दामोदरे, मुन्ना बोडे, विवेक पाटील, सोनू इरफान मिस्त्री, अतुल ठाकुर, निखील मालगे, रुपेश माहुरकर, आशिष हिरोळे, गणेश भोलाणकर, प्रमोद भोलाणकार, नितेश राठोड, सुशील भुते, मयुर साठे, शुभम खंडेलवाल, आणि पदाधिकारी उपस्थित होते.