अवकाश संशोधनात भारतीय महिला अग्रेसर -डॉ.आर.पी.सिंह

0

भुसावळ- भारतीय इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम क्षेत्र महिलांसाठी आणि मुलींसाठी मोकळे अवकाश देणारे क्षेत्र ठरत आहे. इलेक्ट्रॉनिक सर्किट डिझाइन सारख्या पारंपरीक उद्योगांबरोबरीनेच रोबोटिक्स, व्हीएलएसआय, संरक्षण, नॅनोटेक्नॉलॉजी, मोबाइल कंपन्यामध्ये काम करण्यात महिला अग्रेसर आहेत त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे इस्रोच्या यशात असलेला महिला अभियंत्यांचा वाटा फार मोठा असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी येथे केले. श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक महिला दिन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसंगी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकॉम विभागातील दामिनी झोपे आणि ग्लोरिया गवई यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था व कार्याची उत्कृष्ट माहिती सादर केल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी. सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, विभाग प्रमुख डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.सुलभा शिंदे, प्रा.नीता नेमाडे, प्रा.धीरज पाटील, प्रा.अनंत भिडे, प्रा.धीरज अग्रवाल, प्रा.स्मिता चौधरी, प्रा.गजानन पाटील, प्रा.दीपक खडसे, प्रा.दिपक साकळे, प्रा.संतोष अग्रवाल यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले.

महिला विकासाला बळ -डॉ.कुलकर्णी
महिलांना व मुलींना टेलीकम्युनिकेशन यंत्रणेशी निगडीत क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होते आहे कारण भारतीय उद्योगिक धोरणांमूळे महिला विकास मंडळाला बळ प्राप्त झाले असून आता मुली व महिला केबल, रेडीओ, सॅटेलाईट, संवाद माध्यमे, टी.व्ही., रडार, नेव्हीगेशनल कम्युनिकेशन यंत्रे, सर्व प्रकारची माहिती आणि प्रसारासंदर्भातील क्षेत्रात काम करतांना दिसत असल्याचे विभागप्रमुख डॉ.गिरीश कुलकर्णी म्हणाले.