अवघ्या आठ तासात तेजस करमाळीत दाखल

0

करमाळी । अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली तेजस ट्रेन काल गोवाच्या करमाळी स्टेशनला रात्री साडेबारा वाजता पोहचली. अवघ्या आठ तासामध्ये तेजसने सीएसटी ते करमाळीचे अंतर पार केले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर काल संध्याकाळी साडे चार वाजता ही ट्रेन मुंबई सीएसटीहून गोव्याच्या दिशने निघाली होती. साडे आठ तासात तेजस एक्स्प्रेस करमाळीमध्ये पोहोचणे अपेक्षित होते. पण तेजसने हे अंतर अवघ्या 8 तासामध्ये पार केले आहे. बुधवारपासून या गाडीची नियमित सेवा सुरु होणार आहे.

ही ट्रेन मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी पाच दिवस धावणार आहे, असून ती पहाटे पाच वाजता सीएसटीवरुन सुटेल, आणि करमाळीत दुपारी 1.30 वाजता दाखल होईल. तर परतीच्या प्रवासासाठी ही गाडी दर मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी दुपारी 2.30 वाजता करमाळीहून सुटले. आणि सीएसएमटीमध्ये रात्री 11 वाजता पोहचेल. पावसाळ्यात ही ट्रेन तीन दिवसच धावणार आहे. पावसाळ्यामध्ये दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी सीएसएमटी येथून पहाटे 5 वाजता ही गाडी सुटून दुपारी 3.30 वाजता करमाळीत दाखल होईल. तर परतीच्या प्रवासात सकाळी 7.30 वाजता दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी करमाळी स्थानकातून सुटून संध्याकाळी 7.45 वाजता सीएसएमटीमध्ये दाखल होईल. रेल्वेने या गाडीचे मेन्यूकार्ड आणि दरपत्रकही प्रसिद्ध केले असून, नाश्तासाठी तुम्हाला 122 ते 155 रुपये तर जेवणासाठी 222 ते 244 रुपये मोजावे लागतील.