एरंडोल । डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत पद्मश्री डॉ.श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली एरंडोल शहरात बुधवारी 1 मार्च रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात सर्व श्री सदस्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवत जवळपास हजार त दीड हजार सेवेकरी सहभागी झाले होते.सकाळी सात वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत शहरातील तहसील कार्यालय, भूमिअभिलेख, पोलीस स्टेशन, कोर्ट, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय गिरणा वसाहत, प्रांत कार्यालय, वनविभाग परिसर, आय.टी.आय, दि.श.पाटील कॉलेज, नगरपालिका, पशुवैध्याकीय दवाखाना, सार्वजनिक बांधकाम, पोलीस वसाहत, आठवडे बाजार,डेली बाजार, शहरातील मुख्यमार्ग सह संपूर्ण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
जवळपास 50 टन काढला कचरा
यावेळी सर्व श्री सदस्यांनी खराटा, फावडा, पाटी, सफाईला लागणारे साहित्य सोबत आणले होते. तर चारचाकी वाहन धारकांनी आपले वाहन या अभियानात निशुल्क आणले होते तालुक्यातून पिंपळकोठा, पिंप्री बु., कासोदा, म्हसावद, राणीचे बांमरुड, शिरसोली आदी गावाहून सेवेकारींनी सेवा दिली. एकूण 45 चारचाकी वाहनांच्या साह्याने जवळपास 50 ते 55 टन कचरा शहराबाहेर काढण्यात आला.