अवघ्या तासाभरात सोडवल्या तक्रारी

0

जळगाव । एमआयडीसी पोलिस ठाण्यातर्फे शनिवारी अप्पर अधिक्षक बच्चनसींग, डीवायएसपी सचिन सांगळे यांच्या उपस्थितीत तक्रार निवारणदिन साजरा करण्यात आला. पोलिस ठाण्यात दाखल विवीध तक्रारी अर्ज, कौटूंबीक तक्रारींवर अप्पर अधिक्षक, डीवायएसपी यांनी तक्रारदारांचे समाधान होईल अशा पद्धतीने पंधरा ते विस तक्रारी अवघ्या तासाभरात सोडवल्या. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गेल्या महिन्याभरात विवीध प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. घरभाडेकरु, पतीपत्नीचा वाद, शेजार्‍यांच्या भानगडी आणि त्यातुन होणार्‍या हाणामारीचे प्रकार अशा स्वरुपांच्या पंधरा ते विस तक्रारी पोलिस ठाण्यात अर्ज स्वरुपात करण्यात आल्या होत्या.

निरीक्षक सुनील कुराडे यांच्यातर्फे पोलिस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. शनिवारी साडे अकरा वाजता तक्रारदार व ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे अशा दोघा पक्षांना पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे सुचित करण्यात आले होते. अप्पर अधिक्षक बच्चनसींग, डीवायएसपी सचिन सांगळे यांच्या समक्ष तक्रारदारांनी आपले म्हणणे मांडल्यावर गैरअर्जदारांना जाब विचारण्यात आला. कायद्याचा धाक दाखवुन संबधीतांचे जबाब नोंदवुन अर्ज फाईल करण्यात आले. तक्रार निवारण दिनासाठी संबधीत तपासी अंमलदार पोलिस निरीक्षक दुय्यम अधीकार्‍यांची उपस्थीती होती.