अवघ्या नभोमंडलावर पसरली भिमविचारांची निळाई

0

धुळे । शनिवार, 14 रोजी सकाळी अवघ्या धुळ्याच्या नभोमंडलावर म्हणजे आकाशात निळ्या मखमलीचे आवरण दिसू लागले. धुळे शहरात सर्वत्र वार्‍याच्या झुळकेबरोबर निळे ध्वज मोठ्या डौलाने फडकत होते. आजची सकाळ जयंती उत्सवाचा एक वेगळाच जोश घेऊन आल्याचे जाणवत होते आणि घडतही त्याचप्रमाणे होते. जयंती उत्सवानिमित्ताने धुळ्यात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. विविध कार्यक्रमांची रेलचेल ठिकठिकाणी दिसून आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. भव्य मिरवणूक, मोटरसायकल रॅली, रक्तदान शिबीर, विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वितरण यासह सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळला होता. शहरातील बसस्थानकाजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी 9 वाजता बुद्धवंदना झाली.

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, पोलीस अधीक्षक एम. रामकुमार, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, तहसीलदार अमोल मोरे, डीवायएसपी सचिन हिरे, मनपा आयुक्त डॉ. सुधाकर देशमुख, उपायुक्त रवींद्र जाधव, अभियंता कैलास शिंदे, अभियंता रावसाहेब ओगले, मंडळ अधिकारी सागर नेमाणे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, प्रकाश मुंडे, दिवानसिंग वसावे, दिलीप गांगुर्डे, दत्तात्रय पवार, शिवाजीराव बुधवंत, एपीआय. अभिषेक पाटील, श्री. सपकाळ, रिपाईंचे प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिक दामोदर, शशीकांत वाघ, दलित नेते किशोर गायकवाड, एम.जी. धिवरे, रवीकांत वाघ, दिलीप साळवे, एस.यू. तायडे, हरिश्‍चंद्र लोंढे, दिलीप साळवे, सिद्धार्थ बोरसे, शंकर खरात, अनिल दामोदर, रमेश श्रीखंडे, विलासराव करडक, बापू खलाणे, भैय्या पारेराव, संजय बैसाणे, अ‍ॅड. संतोष जाधव, प्रशांत बागुल, अ‍ॅड. उमाकांत घोडराज, अ‍ॅड. राहूल वाघ, डॉ. माधुरी बोरसे, प्रतिभा चौधरी, रत्ना बडगुजर, मंजूळा गावीत, मिना बैसाणे, विमल बेडसे, शोभा चव्हाण, कुंदन खरात, अनुप अग्रवाल, पारुजी गवळी, प्रशांत बागुल, चंद्रकांत गुजराथी, हिरामण गवळी, अमोल धामणे, हिलाल माळी, सुनील बैसाणे, किरण जोंधळे, संजय जवराज, संजय जाधव आदी उपस्थित होते.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
शहरातील विविध राजकीय, सामाजिक, संस्था व संघटनांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी इतरही उपक्रम पार पडले. यात मिनाताई बैसाणे यांच्याकडून महिला भगिनींना साड्या वाटप करण्यात आल्या तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. बडगुजर प्लॉट येथे नरेंद्र अहिरे यांच्यातर्फे लस्सी वाटप आणि साड्या वाटप करण्यात आल्या तर लोकजनशक्तीचे दिलीप साळवे यांच्यातर्फे चहा, कॉफी वाटप करण्यात आले.

‘जयभिम’च्या जयघोषात समता सप्ताहाचा समारोप
धुळे । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेच्या निर्मितीसाठी केलेले कार्य अलौकिक आहे. या कार्याचा आपण अंगीकार केला पाहिजे. विसंवादामागील कारणे शोधून सामाजिक सलोखा राखला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित सामाजिक सप्ताहाचा समारोप शनिवार, 14 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर कल्पना महाले, आमदार डि.एस. अहिरे, जि.प. चे अध्यक्ष शिवाजी दहिते, पोलीस अधिक्षक एम.रामकुमार, मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, डिवायएसपी श्रीकांत घुमरे, दलीतमित्र महासंघाचे अध्यक्ष वाल्मीक दामोदर, संजय पगारे, रमेश श्रीखंडे उपस्थित होते.

कार्य कायमस्वरुपी आचरणात आणा
यावेळी डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, शिक्षणाचे प्रमाण वाढले, तर जाणिवा वाढतात. तसेच आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून समाजातील विसंवाद कमी होवून एकसंघ समाजाची निर्मिती होते. त्यामुळे सामाजिक समतेच्या वृध्दीसाठी आपण कटिबध्द होवून हे कार्य एका सप्ताहापुरता मर्यादीत न ठेवता कायमस्वरूपी आचरणात आणावे.

पोलीस बॅण्डतर्फे मानवंदना
यावेळी प्रथमच पोलीस प्रशासनाच्या बँण्ड पथकामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. शहर पोलीस ठाण्याजवळील भव्य अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला शहरातील नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून मोठ्या संख्येने मानवंदना दिली. ‘जयभिम’ च्या जयघोषाने सर्व नागरिकांमध्ये उत्साह संचारला होता.

तर्‍हाड कसबे जि.प.मराठी शाळा
वरुळ । शिरपूर तालुक्यातील तर्‍हाडकसबे येथे जि.प. मराठी शाळेत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच महेश पाटील हे होते. यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष नरेंद्र कोळी, मुख्याध्यापक नलिनी पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात दिनेश धनराज, राजेश दाभाडे, रोहिदास भोई, विजय पावरा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यावर मनोगत व्यक्त केले. यावेळी गावाचे पोलीस पाटील सुभाष पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष हिम्मतसिंग राजपूत, वसंत धनराज, कांशीराम कोळी, रविंद्र गिरासे, नाना भिल, तुकाराम कोळी, रविंद्र बंजारा, बापू कोळी, खंडू मोरे, शेम्पा कोळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमानंतर लगेच गावात मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दाभाडे यांनी केले. यशस्वीतेसाठी हेमंत धनगर, कृष्णा पाटील, योगिता पाटील, मनोज पाटील आदींनी परिश्रम घेतले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
धुळे । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त शनिवार, 14 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे उपस्थित होते.

तर्‍हाडी जि.प. मराठी शाळा
तर्‍हाडी । शिरपूर तालुक्यातील तर्‍हाडी येथील जि.प. मराठी शाळेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कैलास भामरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र खोंडे, मुख्याध्यापक गणेश पवार उपस्थित होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन कैलास भामरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अरुण सुर्यवंशी, शशिकांत बोरसे, मुख्याध्यापक गणेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अरुण सुर्यवंशी यांनी केले. यशस्वीतेसाठी उपशिक्षिका शुभांगी देवरे, वदंना पाटील, श्री. गवळी, शशिकांत बोरसे यांनी परिश्रम घेतले.

पिंपळनेर महाविद्यालय
पिंपळनेर । आजच्या काळात समाजातील पराकोटीला पोहोचलेली विषमता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच नष्ट करणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.टी. सोनवणे यांनी केले. पिंपळनेर महाविद्यालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. श्री. सोनवणे पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्याने समाजातील सर्व घटकांना समतेचा संदेश देऊन एक नवा इतिहास घडविला. त्यांचे हे महान उपकार भारतीय समाज कधीही विसरणार नाही, असे ही ते यावेळी म्हणाले. यावेळी प्रा. प्रदीप सावळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक कार्याची ओळख करुन दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ. राम पेटारे यांनी केले.

बळसाणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
बळसाणे । येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच दरबारसिंग गिरासे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी श्री. गिरासे यांनी भीमजयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करा, असे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र जीवनच स्पर्धा परीक्षा देणार्‍या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे आपल्या ध्येयाचा अखंड पाठलाग करा. तोच बाबासाहेबांना खरा नमस्कार ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी उपसरपंच बापू मालचे, देविदास धनुरे, जितेंद्र गिरासे, सुरेश महाले, उत्तम महाले, हिरालाल महाले, निंबा धनुरे, शाना शिरसाठ, बालु महाले, विकी सोनवणे, रोहीदास महाले, बुधा पगारे, प्रवीण धनुरे, नाना शिसोदे, अशोक गिरासे, प्रकाश दाभाडे, लक्ष्मण मासुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नाना शिसोदे यांनी केले.

एसएमटी इंग्लिश मीडियम स्कुल
होळनांथे । येथील सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी दोन गटात वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर जैन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनील पाटील उपस्थित होते. यावेळी प्राचार्या जीबी जोसेफ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीराम पाटील यांनी तर सुत्रसंचालन कविता पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी दीपक सोनवणे, दिनेश सुतार, सीजो जॉज, जयश्री पाटील, हेमा पाटील, धनश्री पाटील, रोशनी राजपूत आदींनी परिश्रम घेतले.