अवघ्या १४ वर्षाचा दहशतवाद्यादी कंठस्नानी

0

श्रीनगर-जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये कालपासून चकमक सुरु आहे. यात दोन दहशवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दहशतवाड्यांमध्ये अवघ्या चौदा वर्षाच्या दहशतवाद्याचा देखील समावेश आहे. श्रीनगरच्या मजगुंड परिसरात मुदासीर (१४) याचा खात्मा करण्यात आल्याची माहिती आहे.

इयत्ता ९ वी पर्यंत शिकलेला मुदासीर लश्कर-ए-तोयबाशी संबंधित होता व ३१ ऑगस्टपासून त्याचा मित्र बिलालसोबत घरातून गायब होता. मुदासिर आणि बिलाल दोघेही ५ महिन्यांपासून गायब होते. त्या दोघांना घरी परत बोलावण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रचंड प्रयत्न केले होते. मुदासीर हा हाजिन बांदीपोरा येथील रहिवासी आहे. ज्या दिवशी हे दोघे घरातून पळाले त्याच दिवशी हाजिन येथे एक चकमक उडाली होती आणि यामध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. त्याचा व्हायरल झालेला फोटो तीन महिन्यांपूर्वीचा असू शकतो असंही पोलिसांनी म्हटले आहे.