पुणे । लहान मुलांपासून तर तरुणाईपर्यंत सर्वांचाच आवडता असा पिझ्झा मोठमोठ्या आकारात उपलब्ध असतो. परंतु हाच पिझ्झा अगदी छोट्या आकारात मिळाला तर नवल वाटणे सहाजिकच आहे. विश्वास बसणार नाही ना परंतु होय असाच काहीसा आगळावेगळा विक्रम भांडारकर रोड येथील ऑस्टिन 40 कॅफे हाउसचे शेफ सर्वेश जाधव यांनी केला आहे.
अवघ्या 1 इंचाचा पिझ्झा
जगात सर्वात लहान पिझ्झा करणारा शेफ सर्वेश हा पहिला विक्रमवीर ठरला आहे. दोन बोटांमध्ये धरून खाता येईल असा अवघ्या 1 इंचाचा पिझ्झा शेफ सर्वेश यांनी बनविला आहे. त्याने सहकार्यांच्या मदतीने 4000 छोट्या पिझ्झा बनविण्याचा अनोखा विराम केला आहे. त्याच्या ह्या विक्रमाची दखल घेत त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
गरिबांना परवडण्यासारखा व्हेज पिझ्झा
हे छोटे पिझ्झा फक्त आणि व्हेजमध्ये उपलब्ध करणार असून याची किंमत गरिबांना परवडण्यासारखी आहे. या पिझ्झावर भाज्या आणि चीजचे टॉपिन्ग्स करण्यात आले आहे. विशेष सॉस घातल्याने याची लज्जत चाख्ण्यासारखी आहे. हा पिझ्झा छोटा असला तरी याच्या चवीमध्ये काही फरक पडलेला नाही.
4000 पिझ्झाचे वाटप वंचित मुलांना
या 4000 पिझ्झाचे वाटप खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड परिसरातील वंचित मुलांना केले. दरम्यान यावेळी सँताक्लॉज कडून मुलांना पिझ्झाचे वाटप करण्यात आले. यावेळी छोट्या पिझ्झा ना फस्त करण्याचा आनंद ए मुलांच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता.
पुढल्या वर्षी आणखी काहीतरी नवे
याच विक्रमावर न थांबता पुढल्या वर्षी आणखी काहीतरी नवे घेऊन येण्याचा मानसही शेफ सर्वेश यांनी दरम्यान व्यक्त केला. यावेळी विष्णू मनोहर (शेफ), किशोर सरपोतदार (कॅतरस), प्रदीप बलवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाची नोंद करण्यात आली.
जगातला पहिला उपक्रम तोही पुण्यात घडतो आहे हे बघून खूप छान वाटते आहे. मी स्वतः त्याने केलेल्या या उपक्रमाचा साक्षीदार आहे. असेच वेगवेगळे रेकॉर्ड्स सर्वेशने करावे अशी माझी मनापासून इच्छा आहे.
– विष्णू मनोहर, प्रसिद्ध शेफ
जवळपास 4000 खूप छोटे असे पिझ्झा करण्याची संकल्पना अशी होती की गरीबातल्या गरिबाला पिझ्झाची चव चाखता यावी. याची किंमत 1 रुपया असेल. हे पिझ्झा खूप छोटे आहेत आणि हाच विक्रम आहे. आम्ही हे पिझ्झा खडकी कॅन्टोनमेंट येथील वंचित मुलांना वाटणार आहोत. हा पिझ्झा फक्त व्हेजमध्येच मिळणार आहे.
– सर्वेश जाधव, विक्रमवीर शेफ