अवनीच्या मुद्द्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत भाजप-सेनेच्या मंत्र्यांमध्ये खडाजंगी?

0

मुंबईः आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अवनीच्या हत्येसंदर्भात जाब विचारला. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत भाजपा आणि सेनेच्या मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली. परंतु बैठकीत असे काहीही झाले नसल्याचा खुलासा वनमंत्री सुधी मुनगंटीवारांनी केला आहे.

अवनी या वाघिणीला ठार करण्यात आल्यानंतर सरकारवर टीका होत आहे. सरकारवर अवनीच्या हत्येचा आरोप केला जात आहे. शिवसेनेने यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.