‘अवनी’ला ठार केल्याच्या निषेधार्थ गांधीजींचे विचार मांडत राहुल गांधीनी सरकारला केले लक्ष

0

नवी दिल्ली – यवतमाळमधील अवनी (टी-1) या नरभक्षक वाघिणीला ठार केल्याप्रकरणी भाजपा सरकारवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी देखील सरकारवर अवनीच्या हत्येचा आरोप करत जबाबदार धरले आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. महात्मा गांधी यांनी मांडलेला विचार ट्विट करत त्यांनी अवनी वाघिणीला ठार केल्याच्या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.

”देशात प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरुन देशाची महानता ठरते, असे महात्मा गांधी यांनी म्हटले होते, असे ट्विट करत त्यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.