अवनी ठरली भारताची पहिली महिला लढाऊ विमान पायलट

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अवनी चतुर्वेदी ही दिल्लीची 27 वर्षीय नौदल अधिकारी लढाऊ विमान एकटीने चालवणारी पहिली महिला लढाऊ विमान पायलट ठरली आहे. तिच्या या कामगिरीमुळे देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सोमवारी मिग-21 बायसन नावाचे लढाऊ विमान अवनीने गुजरातमधील जामनगर भारतीय वायूसेनेच्या तळावरून चालवले. अवनीसोबतच भावना कांथ आणि मोहना सिंग यांची जून 2016 मध्ये लढाऊ विमानाच्या नौदल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. या दोन महिलाही आपले एकेरी लढाऊ विमान उड्डाण लवकरच करणार आहेत.

देशातील महिलांसमोर ठेवला आदर्श
अवनीला तिच्या पहिल्या विमान उड्डाणासाठी हवाई दलाकडून प्रशिक्षण देण्यात आले; तसेच मागील आठवड्यात हवाई दलातील प्रशिक्षकांसह दोन आसनी जेट विमानामध्ये प्रशिक्षित करण्यात आले. अवनीने लढाऊ विमान उड्डाणाचे मुलभूत प्रशिक्षण घेतले, तसेच हकिमपेठ येथे किरण लढाऊ जेट्सवरदेखील सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर बिदर वायूदल येथे हॉक अ‍ॅडव्हान्स ट्रेनर जेट्सवरही एका वर्षाचे प्रशिक्षण घेतले. 21 व्या शतकात महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत असताना लढाऊ विमान एकटीने चालवत अवनीने महिलांसमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.