धरणगाव । बीड जिल्ह्यातील परळीतील विठ्ठल वंजारी या इसमाने छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ माता यांच्या विरोधात अपशब्द बोलल्याने त्यांचा अपमान केला. अशा व्यक्तीवर शासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणीचे निवेदन येथील पोलीस स्टेशनला देण्यात आले. याप्रसंगी निवेदन देतांना गोपाळ पाटील, संभाजी बिग्रेडचे तालुकाध्यक्ष गुलाब मराठे, नगरसेवक चंदन पाटील, विलास पाटील, घनश्याम पाटील, लक्ष्मण पाटील, वाल्मिक पाटील, भीमराज पाटील, भूषण मराठे, भूषण पाटील, भाऊसाहेब पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.