पुणे । अवयव दान हे मानवाला मिळालेले वरदानच आहे. रक्तदान, नेत्रदान या बरोबरच अवयवदानाची चवळवळ पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी व्यक्त केले.
बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वतीने महाअवयवदान जनजागृती अभियानाअंर्तगत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 8.30 वाजता बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणातून प्रभातफेरीला सुरुवात झाली. यावेळी गिरीश बापट यांनी अवयव दानाची शपथ घेतली. ससून रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. अजय चंदनवाले, उपअधिष्ठता डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. समीर जोशी, डॉ. अजय तावरे आदी यावेळी उपस्थित होते. मानवाचे अवयव मानवाला निर्माण करता येत नाहीत. म्हणून मानवाला ते दान करावे लागतात. ब्रेन डेड रुग्णाचे हृदय, यकृत, किडनी, नेत्र, त्वचा आदी अवयव निरोगी असल्यास गरजू रुग्णांना दान करून पूर्नजन्माचा अनुभव मिळतो. या अवयवदानाच्या जनजागृतीची समाजाला मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे, असे डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले.