एरंडोल : अवयवदानामुळे अनेक रुग्णांना जिवदान मिळत असुन अवयवदानाबाबत समाजात जनजागृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दादासाहेब पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील यांनी केले. राज्य शासन व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त परिपत्रकानुसार पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाअवयवदान अभियानप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील यांनी सांगितले कि, अवयवदाना बाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. समाजात अवयवदाना बाबत असलेली भीती दूर करण्याचे व समाजात जनजागृती करण्याचे काम विद्यार्थ्यांनी कराव असे आवाहन त्यांनी केले.
पाटील महाविद्यालयात अवयवदान अभियान
माणसाचा मृत्यु झाल्यानंतर त्याचे शरीर निरुपयोगी होत असते. मात्र अवयवदान केल्यास त्याचा रुग्णांना फायदा होऊन अवयवाच्या माध्यमातुन मृत व्यक्ती जिवंत राहत असतो.त्यामुळे अवयवदान हि काळाची गरज बनली आहे. अवयवदान अभियान सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वकृत्व स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी अवयवदान बाबत असलेले समज व गैरसमज याबाबत उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.टी.चीमकर,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एन.एस.तायडे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.रेखा साळुंखे, यांचेसह स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते