अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन

0

शहादा- सिनिअर आर्ट्स महिला महाविद्यालय व जायन्ट्स ग्रुप परिवार शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. रॅली सिनिअर आर्टस महाविद्यालयातून निघून पंचायत समिती, बस स्टँड व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समाप्त झाली. या रॅलीस प्राचार्या मंगला चौधरी, प्रा.राजेंद्र निकुंभे,प्रा काकासाहेब अनपट, प्रा.संतोष तमखाने,प्रा.किरण माळी,प्रा.मंगला पाटील, प्रा.रेणुका पाटील, प्रा.दीपिका पटेल, प्रा.मोनिका पाटील, प्रा.ज्ञानेश्‍वर गवळे अर्चना सोनार,प्रीती सोनार,उर्मिला जाधव व संगीता पाटील, मानक चौधरी, दीपक भामरे उपस्थित होते.