अवसरी-लोणी रस्त्याची दुरवस्था

0

निरगुडसर । पावसामुळे अवसरी ते लोणी धामणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता ठिकठिकाणी उखडला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अवसरी, मेंगडेवाडी, जारकडवाडी ते धामणी या १० किमी अंतरावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याने शेतमालाची वाहतूक तसेच प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. जारकडवाडी गावानजीक वर्षभरापासून या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. परंतु त्याकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नसल्याचे दिसून येते. हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.