अविनाशी सेवा पुरस्काराची करण्यात आली घोषणा

0

जळगाव । केशवस्मृती प्रतिष्ठान व जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे देण्यात येणार अविनाशी सेवा पुरस्कर शबरी सेवा समिती व नरसिंग झरे यांना पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला आहे. याप्रसंगी निवड समिती सदस्य प्रकाश पाठक, केशकस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रकाश अमळकर, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव, उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव, संचालक सतीश मदाने आणि केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील उपस्थित होते.

पुरस्कराचे 4 थे वर्ष
अविनाशी पुरस्कारचे वितरण रविवार 5 फेब्रुवारी रोजी कांताई सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता करण्यात येणार आहे. हा पुरस्कार केशवस्मृती सेवासंस्था समूह हा वटवृक्ष उभार करणारे स्व. डॉ. अविनाश आचार्य यांच्या नावाने दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप संस्थेला 1 लाख 1 हजार रूपये तर व्यक्तिगत पुरस्कारात 51 हजार रूपये रोखसह मानपत्र व स्मृतीपत्र असे आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्या अध्यक्षपदी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू पी. पी. पाटील असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जैन उद्योग समुहाचे अशोक जैन तर प्रमुख वक्ते म्हणून हैद्राबाद येथील ज्येष्ठ विचारवंत व स्तंभलेखक जयंत कुळकर्णी उपस्थित राहणार आहेत. अविनाशी पुरस्कराचे हे चौथे वर्षअसून संस्थात्मक गटातून रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील कुपोषण निर्मुलन व मुलांच्या आरोग्यासाठी काम करणारी संस्था शबरी सेवा समिती व व्यक्तिगत पुरस्कार गेल्या पंधरा वर्षांपासून भटक्या विमुक्त जातींसाठी गोपला समाज परिषदेच्या माध्यमातून काम करणारे लातुर जिल्ह्यांतील निलंगा येथील नरसिंग झरे यांना देण्यात येणार आहे.