अविनाश युवा प्रतिष्ठानचे कार्य आदर्शवत : सचिन चिंचवडे

0

रावेत : स्व. अविनाश युवा प्रतिष्ठानचे आजपर्यंतचे कार्य नेहमीच समाज उपयोगी राहिले आहे. प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य समाजासाठी आदर्शवत असून, विविध मार्गाने समाजकार्याचा घेतलेला वसा प्रतिष्ठानने पुढेही असाच अविरतपणे चालू ठेवावा, असे प्रतिपादन ‘ब’ प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे यांनी केले. चिंचवडेनगर येथे स्व. अविनाश चव्हाण यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त अविनाश युवा प्रतिष्ठान, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी चिंचवडे बोलत होते.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमप्रसंगी संयोजक अतुल चव्हाण, नगरसेविका करुणा चिंचवडे, सचिन चिंचवडे, नामदेव ढाके, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, दत्तात्रय चिंचवडे, पोलीस मित्र संघटनेचे शहराध्यक्ष गजानन चिंचवडे, दत्तात्रय चिंचवडे, प्रशांत चिंचवडे, डॉ. लक्ष्मण गोफणे, सागर वाघमारे, कमलाकर गोसावी, तानाजी गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

100 जणांनी केले रक्तदान
या शिबिरात 100 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे संयोजक अतुल चव्हाण यांच्या वतीने वृक्षारोपणाचा संदेश देत भेटवस्तू म्हणून वृक्षाचे रोपटे व प्रशस्तिपत्रक रक्तदात्यांना देण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन, जय शिवराय प्रतिष्ठान वाल्हेकरवाडी, नवयुग तरूण मंडळ, भोलेश्वर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.