जळगाव ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीसांची कारवाई
2 लाख 23 हजार रूपयांची अवैध गावठी दारू केली नष्ट
जळगाव – जिल्ह्यात अवैधरित्या गावठी दारूची बेसुमार विक्री होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणी पोलीसांनी छापे टाकत गावठी हातभट्टी व कच्चे रसायने उद्ध्वस्त केले. या कारवाईत एमआयडीसी पोलीस ठाण्यात 7 जणांवर, तालुका पोलीसात 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 2 लाख 23 हजार रूपयांचे दारू करण्याचे कच्चे रसायन नष्ट केले आहे. पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे व अ.पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांच्या सुचनेनुसार डीवासएसी सचिन सांगळे, एलसीबीचे पो.नि.सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाने पथकाने कारवाई करत कच्चे रसायन नष्ट केले.
15 जणांवर कारवाई
एमआयडीसी हद्दीत असलेले तांबापूरा, कंजरवाडा या परीसरात अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू आणि कच्चे रसायने मिळून आल्याप्रकरणी सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात नविन जयचंद बांटुगे रा. मंगलपुरी, रामेश्वर कॉलनी, शेख शफी शेख निजाम, वसंत सिताराम सुरवाडे दोन्ही रा.फुकटपूरा, पंचशिलनगर, प्रेमा गजमल कंजर रा. जाखणी नगर कंजरवाडा, अलका क्रांती बांटुगे रा. कंजरवाडा, मेहरूण, फारूख खान इस्माईल खान रा. बिसमिल्ला चौका, शेख शब्बीर शेख अन्वर रा.शिरसोली तर जळगाव तालुका हद्दितील आरोपी कालु रामसिंग कोळी, अनिल देशमुख सह दोन आरोपी चौघे रा. भोलाणे ता.जि.जळगाव, जगन कौतीक तायडे रा.कासवा ता.यावल आणि केदार धावरिया रा.उदळी या पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
पथकातील यांनी कारवाई
एलसीबी विभागातील सपोनि सागर शिंपी, महेश जानकर, सुप्रिया देशमुख, एमआयडीसी पो.स्टे.चे सपोनि विकास धनवट, पोउनि विशाल वाठोरे, राजकुमार ससाणे, संदीप पाटील, स.फौ. मनोहर देशमुख, रविंद्र पाटील, शरद भालेराव, रामचंद्र बोरसे, श्रावण पगारे, रा.का.पाटील, मुरलीधर बारी, सुरज पाटील, अनिल देशमुख, किरण चौधरी, प्रविण हिवराळे, अनिल इंगळे, सुरेश महाजन, संतोष मायकल, संजय सपकाळे, रमेश चौधरी, गायत्री सोनवणे, एलसीबी सतिष हाळनोर, वासुदेव मराठे, पोपट सोनार, अमिर तडवी, प्रशांत पाटील, प्रफुल्ल धांडे, अनिल मोरे, जळगाव तालुका पो.स्टे.चे पोहेकॉ रामकृष्ण पाटील, संजय भोई, अतुल वंजारी, अशोक भजना, परिष जाधव, किशोर पाटील, हेमंत कळसकर, प्रविण जाधव यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कारवाई केली.