अवैधरित्या दारू घेवून जाणारा ट्राला पकडला

0

शहादा । मध्यप्रदेशातील पानसेमल येथून धडगावकडे विनापरवाना बनावट देशी -विदेशी दारू घेवून जाणारा ट्राला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी तालुक्यातील म्हसावद चफुली गावानजीक रविवार 24 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास पकडला. मध्यप्रदेशातुन अवैधरित्या धडगावकडे जात असतांना म्हसावद चफुली जवळ सापळा रचून ही धाडसी कारवाई केली. या ट्रालागाडीत 800 खोके बनावट दारूचे खोके सुमारे 43 लाख व ट्रालाची किंमत 25लाख रुपयांची सुमारे 67 लाखाचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त करून दोन जणांना अटक केली आहे.