रावेर : तालुक्यातील मौजे विश्राम जिन्सी येथे अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धाव घेतल्यानंतर एक ट्रॅक्टर अंधाराचा फायदा घेवून पसार झाले तर दुसर्या ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कैलास गुरुमुख पवार, गोपाळ गुरुमुख पवार, गुरुमुख खेमा पवार (रा.जीन्सी, ता.रावेर) यांच्या मालकीचे वाहन (क्रमांक एम.एच.19 एम.4037) हे वाहन अवैधरित्या मुरुम या गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतूक करताना आढळले तर (क्रमांक एम.एच.19 एम.2037) हे वाहन जागेवर आढळले तर एक वाहन अंधाराचा फायदा घेवून पळाले. तिन्ही वाहन मालक यांना दंडात्मक नोटीस देण्यात आली. ही कारवाई तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल नायब तहसीलदार सी.जी.पवार, मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी दादाराव कांबळे यांनी केली.