भुसावळ : हॉटेलमध्ये अवैधरीत्या मद्य विक्री होत असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत सुमारे 31 हजारांचा मद्यसाठा जप्त केला.
हॉटेल चालकाविरोधात गुन्हा
जामनेर रोडवरील चोरवड शिवारातील भागाई हॉटेलमध्ये सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक हरीष भोये, नंदकिशोर सोनवणे, रमण सुरळकर यांनी ही कारवाई केली. हॉटेल चालक निवृत्ती नामदेव पवार (वय 46, रा. चोरवड) यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी यासीन पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.