यावल : यावल-भुसावळ रस्त्यावर बेकायदेशीरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर यावल पोलिसांनी जप्त करीत ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला. यावल-भुसावळ रस्त्यावर यावल पोलिस ठाण्याचे कर्मचारी गस्तीवर असताना निमगाव गावाच्या बसस्थानकाजवळ एक विना क्रमांकांचे ट्रॅक्टर अडवल्यानंतर त्यात वाळू आढळली मात्र चालक गोकुळ रघुनाथ सपकाळे (रा.भोलाणे, ता.जि.जळगाव) याच्याकडे वाळू वाहतूक परवाना नसल्याने ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त करीत ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा नोंदवला. पुढील तपास पोलिस नाईक किशोर परदेशी करीत आहेत.