भुसावळ- जोगलखेडा साकेगाव मार्गावर वाघूर नदीपात्रातून वाळू चोरीप्रकरणी डंपरसह सुमारे 2 लाख 56 हजार रूपयांचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी शनिवारी जप्त केला. वाळू ठेक्याची मुदत संपल्यानंतरही नियमबाह्यपणे बेसुमार वाळू उपसा होत असल्याने वाघूर नदीपात्रातून शनिवारी पहाटे तालुका पोलिसांनी महसूल पथकासोबत केलेल्या कारवाईत डंपरसह (क्र.एम.एच.19 झेड.3036) दोन लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. साकेगाव तलाठी हेमंतकुमार महाजन यांच्या फिर्यादीवरून संशयित योगेश रामचंद्र कोळी (रा. साकेगाव) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.