अवैध उत्खनन प्रकरणी कारवाई

0

यावल । अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी विरावली यावल येथील तलाठ्यांनी दोन वाहनांवर कारवाई केली. अवैधरित्या उत्खनन करतांना एक जेसीबी तर एक मिनी ट्रक आढळला.

त्यामुळे यावलचे तलाठी एस.व्ही. सुर्यवंशी यांनी कारवाई केली. चंद्रकांत सपकाळे यांच्या मालकीच्या ट्रकवर (क्रमांक एम.एच. 19 झेड.5858) कारवाई झाली. परसाळे गावाजवळ विरावलीचे तलाठी एस.एस.तायडे यांनीही जेसीबीवर कारवाई केली.