अवैध उत्खनन प्रकरणी महसूल विभागाची कारवाई

0

रावेर। अवैध उत्खनन करणार्‍यांविरुध्द तहसिल प्रशासनाने धडक मोहिम हाती घेतली आहे. तहसिलदार विजयकुमार ढगे यांनी पथके तयार केले असून मागील 10 दिवसात 1 लाख 36 हजार रुपयांपर्यंत दंड सुमारे 18 ट्रॅक्टरांना दिला आहे. तापी, भोकर, सुकी नदीपात्रातून वाळू, मातीचा उपसा होत असल्याने महसुल अधिकारी, तलाठ्यांनी ट्रॅक्टर आणि एक डंबर जप्त केले. महसूल विभागाने केलेल्या या कारवाईत 8 वाळुंच्या ट्रॅक्टरांवर प्रत्येकी 10 हजार 500 रुपये प्रमाणे तर 10 मातीच्या ट्र्रॅक्टरांवर 3 हजार 160 रुपये प्रमाणे तर एक डंपरवर 21 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

10 दिवसात तब्बल 18 ट्रॅक्टर्सवर कारवाई
तहसिलदार विजयकुमार ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळ अधिकारी, तलाठ्यांना अवैधरित्या वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सुचना आहे. त्यातून मागील 10 दिवसात तब्बल 18 ट्रॅक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. पुढेही अशीच कारवाई सुरु राहणार असैयाचे महसुलतर्फे कळविण्यात आले आहे. दरम्यान, केलेले दंड भरल्यास ट्रॅक्टर सोडायचे कि नाही याबाबतचा प्रस्ताव प्रांताधिकारी घोडे पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला तर महसुल प्रशासनातर्फे दोधा, नेहता, निंभोरासिम परिसरात अवैधरित्या उपसा करणार्‍या वाळु माफियांवर नजर ठेवून आहे.