अवैध कत्तलखाने बंद करण्यासह गायींची वाहतूक थांबवा

0

यावलला नायब तहसीलदारांना हिंदू जनजागृती समितीतर्फे निवेदन

यावल- महाराष्ट्रात गो हत्या बंदी कायदा लागू झाला असतानाही यावल तालुक्यात अवैधरीत्या गो मातेची कत्तल सुरूच असून मोठ्या प्रमाणावर गायींचीही तस्करी होत असल्याने या प्रकाराला पायबंद घालावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना निवेदन देण्यात आले.

गो मातेची सर्रास कत्तल
निवेदनाचा आशय असा की, महाराष्ट्रात हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या गो मातांची तसेच गोवंशियांची हत्या तसेच तस्करी यावर कायद्याने बंदी असतांनाही यावल तालुक्यात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे गोवंशियांची कत्तल सर्रासपणे केली जात आहे. यावल तालुक्यात तसेच यावलमधील मार्गांचा वापर करून गोवंशियांची तस्करी केली जात आहे. तसेच मागील काही महिन्यांत गोवंशियांची चोरी करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या सर्व घटनांमध्ये पोलिसांकडून आवश्यक सहाय्य मिळत नसल्याने, यावर उपाययोजना काढावी. शनिवार, 9 मार्च 2019 रोजी गोवंशीयांची अवैधरीत्या वाहतूक करत असतांना काही जागृत युवकांनी वाहन थांबवले मात्र संबंधितांकडे आवश्यक कागदपत्रे नव्हते तर बाजाराच्या गर्दीचा लाभ घेत गोवंश घेऊन जाणारी गाडी पसार झाली. त्यावर पोलिसांनी काहीच हरकत घेतली नाही.

यांची होती उपस्थिती
हिंदू जनजागृती जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील, नामदेव कोळी, चेतन भोईटे, अविनाश बारसे, उज्वल कानडे, अमोल पाटील, मयुर पाटील, युवा सेना उपशहर प्रमुख प्रवीण बडगुजर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील, अक्षय बारी, सुधाकर धनगर, नितीन बारी, धीरज भोळे, पवनसिंग पाटील, माधव पाटील यांच्यासह हिंदू जनजागृती व इतर हिंदू संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.