पाचोरा । शासनाच्या नियमाचे उल्लंघन करुन बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात अवैध गौणखणीजाचे उत्खनन केले जाते. अवैध वाळू उपसामुळे नदीपात्रा खड्डेमय झाले आहेत.
पावसाळ्यात या खड्डयांचा अंदाज येत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागाते. अवैध गौणखणीज उत्खननाचा पुन्हा एक बळी ठरला आहे. पाचोरा तालुक्यातील उत्राण परिसरातील बहुळेश्वर व उत्राण नदी पात्रात गेल्या अनेक वर्षापासून गौणखणीजाचा उपसा सुरु आहे. त्यात उत्राण येथील अपंग 30-35 वर्षीय तरुण सुरेश दयाराम पाटील याचा बुडून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्याने खड्डयाचा अंदाज न आल्यामुळे त्याला जीव गमवावा लागला आहे. मृत तरुण हा कपडे शिवण्याचा व्यवसाय करीत होता. त्यांच्या पत्नी देखील मयत झालेल्या आहेत. त्याचा पाश्चात एक मुलगी आहे. त्यांच्या निधनाने मुलीवर छत्रछाया हरविले असून मुलगी अनाथ झाली आहे.