अवैध गौण खनिजाचा डंपर तहसील कार्यालयातून पळवला : एकाविरोधात गुन्हा

Bullying of sand mafia increased : Dumper ran away from Bhusawal tehsil office in broad daylight भुसावळ : अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा डंपर तहसील प्रशासनाने जप्त करीत सुमारे अडीच लाख रुपये दंडाची नोटीस बजावली होती मात्र हा जप्त डंपरच मालकाने पळवून नेल्याने त्याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

तहसील आवारातून डंपर पळवला
भुसावळ तहसीलचे कर्मचारी महेंद्र रामचंद्र दुसाणे (मूर्ती नगर, वरणगाव रोड, भुसावळ) यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, डंपर (एम.पी.33 एच.1329) हा अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना 8 जुलै 2022 रोजी आढळल्याने जप्त करण्यात आला होता व डंपर मालक राज मनोज कवडे (कालिका माता मंदिराजवळ, जळगाव) यांना दोन लाख 45 हजार 770 रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली होती. शासकीय दंड भरणे टाळण्यासाठी कवडे यांनी बुधवार, 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 ते गुरुवार, 6 ऑक्टोंबरच्या सकाळी 10 दरम्यान केव्हातरी डंपर पळवून नेला. तपास एएसआय मोहम्मद अली सैय्यद करीत आहेत.