अवैध दारु विक्रेत्यांवर धडक कारवाई

0

भुसावळ। श हर व परिसरात अवैधरित्या सुरु असलेल्या दारु अड्डयांवर सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या पथकाने गुरुवार 3 रोजी 7 ठिकाणी धडक कारवाई करीत 3 लाखाची देशी विदेशी दारु व गावठी हात भट्टीची दारु जप्त केली. या कारवाईमुळे मात्र अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले आहे. तालुक्यातील कंडारी येथे ग्रामपंचायत व्यापारी संकुल परिसरात मनोज देवरे याच्या ताब्यातील 61 हजार 466 रुपये किंमतीची देशी विदेशी दारु जप्त केली. शहरातील वाल्मिक नगरातील भिमराव जानू इंगळे याच्या ताब्यातील 750 रुपयांची गावठी हातभट्टी दारु जप्त करण्यात आली आहे.

नशिराबाद हद्दीतही धडाका
विकेश उर्फ विक्की किशोर टाक याच्याकडून 1 हजार 125 रुपयांची गावठी दारु, दत्त नगर परिसरात सुरेश भवरीलाल याच्याकडून 780 रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली आहे. नशिराबाद येथील इंदिरा चौकात अनिल झगडू भोई यांच्या ताब्यातील 1 हजार 910 रुपयांची देशी दारु, सुनसगांव रोडवरील प्रदीप लक्ष्मण बोडरे यांच्याकडील 6 हजार 700 रुपयांची देशी विदेशी दारु तसेच 2 लाख रुपये किंमतीची चारचाकी वाहन, 25 हजार किंमतीचे दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. तर विलास महाजन (रा. जिल्हापेठ) याच्या ताब्यातील 6 हजार 240 किंमतीची देशी दारु जप्त करण्यात आली आहे.

पोलिस पथकाची कारवाई
या कारवाईत सकाळी 8 वाजेपासून सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अंगत नेमाने, पोलीस कॉन्स्टेबल अरुण झांबरे, विशाल सपकाळे, विनोद वितकर, निलेश बाविस्कर, दिपक जाधव, राजेंद्र साळुंके, संदीप पालवे, अयाज अली, ईआरटी पथकाचे पोलीस नाइक सुनिल सैंदाणे, सुनिल थोरात, प्रशांत चव्हाण, कॉन्स्टेबल श्रीकृष्ण देशमुख, प्रदीप इंगळे, इश्तीयाक अली, आरपीसी प्लॉटूनचे कॉन्स्टेबल संदीप जोशी, हर्षल पाटील यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.